“या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही की,” : निलेश राणे

“या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही की,” : निलेश राणे
“या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही की,” : निलेश राणेमुंबई : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे. मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.'कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायानं देशाच्या विकासाचा विषय आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरीबांसाठी घरं बांधणार होतं. मग आता ही जमिन सरकारची नाही का? अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करायचं, हे काम सध्या सुरु आहे,' अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.तर, ज्या गोष्टीत न्यायालयाने पडायला हवं, न्याय द्यायला हवा, अशी असंख्य प्रकरणं देशात आहेत, तिथे लोक तारीख पे तारीख करुन झिजत आहेत, पंजाबमधील शेतकरी आत्महत्या करत आहेत, काल एका संताने आत्महत्या केली, न्यायालयाने आणि केंद्र सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, केंद्र सरकारला निर्देश दिले पाहिजे, महाराष्ट्रातील सरकार भाजपचं नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का, अशा शंका सध्या लोकांच्या मनात येत आहेत. अस देखील संजय राऊत म्हणाले आहेत.यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'संज्या राऊत म्हणतो कांजूर कारशेडच्या विषयात न्यायालयाने पडू नये. न्याययाचिका दाखल केल्यानंतर न्यायालय आपलं म्हणणं किंवा आपला निर्णय देतात. या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही की कोण न्यायालयात गेल्याशिवाय स्वतःहून न्यायालय निर्णय देत नाही'. असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments