“पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता” : भाजप नेत्यांची उपमुख्यमंत्र्यावर टीका

 “पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता” : भाजप नेत्यांची उपमुख्यमंत्र्यावर टीका मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे ताशेरे झाडल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल अनेक प्रश्नांना तुफान उत्तर दिल्याचे पहायला मिळालं. मात्र आता यावरुनच भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?, असा प्रश्न निलेश राणे यांनी अजित पवारांना विचारला आहे.अजित पवार यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी अजित पवार यांना शेती करण्यासंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. “तीन पक्षांचे सरकार आले आणि हाता तोंडचा घास गेल्याने दु:ख झालंय असे आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता. बिन खात्याचे तीन महिने मंत्री राहण्याचा मानही तुमचाच. तुम्ही इतके दु:खात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात. त्याचं काय झालं?,” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post