तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने केला ब्रेकअप ; अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर दिली माहिती

 तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने केला ब्रेकअप ; अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर दिली माहितीमुंबई : आतापर्यत कलाविश्वातील अनेक जोडप्यांचे अफेअरर्स आणि ब्रेकअप सोशल मीडियावर चांगलेच गाजले आहेत. ‘अभिनेत्री पूजा गौर आणि अभिनेता राज सिंह अरोरा हे विभक्त झाले आहेत. तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने ब्रेकअप केला आहे. याविषयी पूजाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.
“२०२० या वर्षात अनेक बदल पाहायला मिळाले. चांगलं होतं आणि नव्हतंही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या आणि राजच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. त्यामुळे याविषयी व्यक्त होण्यापूर्वी मला थोडा वेळ हवाय. राज आणि मी, आम्ही दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भलेही यापुढे आमचे रस्ते वेगळे असतील.


 मात्र, आमच्यातील मैत्री, प्रेम कायम असेल. त्याचं सगळं चांगलं व्हावं ही एकच इच्छा माझी कायम असेल”,असं पूजा म्हणाली. “यापुढेही आमच्यातली मैत्री कायम असेल आणि ती कधीच बदलणार नाही. याविषयी व्यक्त होण्यासाठी मला बराच वेळ आणि धैर्य लागलं. पण आता यापुढे मी काहीच बोलू शकत नाही. धन्यवाद”.दरम्यान, पूजा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘सावधान इंडिया’, ‘एक नई उम्मीद – रोशनी’, ‘प्रतिज्ञा’ या सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर ‘केदारनाथ’ या चित्रपटात सारा अली खानच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

Previous Post Next Post