रक्ताचा वापर करून शेतकऱ्यांनी पाठवले पंतप्रधान मोदींना खास पत्र

रक्ताचा वापर करून शेतकऱ्यांनी पाठवले पंतप्रधान मोदींना खास पत्र

 रक्ताचा वापर करून शेतकऱ्यांनी पाठवले पंतप्रधान मोदींना खास पत्र 


नवी दिल्ली : केंद्राने मंजूर केलेल्या वादग्रस्त शेतीविषयक कायद्याचा निषेध करत  सीमेवरील आंदोलनाचा एक भाग असलेल्या शेतकरी गटाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यावेत, असे आवाहन केले आहे. त्यांनी रक्ताने लिहिलेल्या पत्रांसह आपले आवाहन व्यक्त केले आहे. 


 सीमेवरील निषेधस्थळी उभारण्यात आलेल्या शिबिरात शेतकऱ्यांनी रक्तदान केले आणि नंतर याच रक्ताचा वापर करून पंतप्रधान मोदींना पत्र लिहून शेतातील वादग्रस्त कायदे रद्द करण्याची विनंती केली आहे.


पत्रात लिहिले आहे: "सुप्रभात, श्री. नरेंद्र मोदी. आम्ही हे पत्र आपल्या रक्ताने लिहित आहोत. तुम्ही आमच्या मतांनी निवडून घेतलेले देशाचे पंतप्रधान आहात. हे तीन कायदे करून शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे. आम्ही विनंती करतो आपण हे कायदे परत घ्या. "Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments