दिघंची शुभम ज्वेलर्स दरोडा : ५३ ग्रॅम सोने लंपास

दिघंची शुभम ज्वेलर्स दरोडा : ५३ ग्रॅम सोने लंपासदिघंची शुभम ज्वेलर्स दरोडा : ५३ ग्रॅम सोने लंपास


आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली येथील मुख्य बाजारपेठेतील शुभम ज्वेलर्सवर दोन अज्ञात दरोडेखोरांनी सिनेस्टाईलने दरोडा टाकत दुकानातील ५३ ग्रँम सोने लुटले असल्याची नोंद आटपाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे. 
याबाबत अधिक  माहिती अशी की, दिघंची मुख्य बाजारपेठेत चोपडी ता. सांगोला जि.सोलापूर येथील दत्तात्रय शहाजी यादव यांचे शुमभ ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. दुपारी २ च्या सुमारास ज्वेलर्स मध्ये दोन अज्ञात तरुण आले व खरेदीच्या बहाण्याने आलेल्या या दोन दरोडेखोरांनी दुकानातील रोहित दगडू भोसले याच्या गळ्याला चाकूचा धाक दाखवत दुकानातील सोन्याचे दागिने लुटून ते पसार झाले.
घटनेनंतर दरोडेखोरांनी पळून जाताना आपल्या आडवे आलेल्यांना चाकूचा धाक दाखवत शिवीगाळी केली. दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यासाठी दुचाकी गाडीचा वापर केला. नंबरप्लेट नसलेल्या मोटारसायकल वरून हे दोघेजन लिंगीवरे मार्गे सातारा जिल्ह्याकडे पळून गेले.
भरदिवसा पडलेल्या या दरोड्याने दिघंची परीसरामध्ये खळबळ माजली आहे. तर मागील महिन्यात पिलीव घाटात एस.टी. बसेसवर ही दरोडा टाकला गेला होता.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments