Type Here to Get Search Results !

EVM मशीनवरती कमळ चिन्ह दिसले नाही म्हणून चिडले आजोबा



भाजपच्या पारंपरिक मतदार संघात यंदा भाजपाचा उमेदवार नसल्याने आजोबांनी राग व्यक्त केल्याचा हा एक प्रकार मतदान केंद्रातून समोर आला आहे.

  

लोकसभा मतदानासाठी आज तिसर्या  टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर रांगा पहायला मिळत आहे. अशात पुण्यामध्ये एक आजोबा 'EVM वर कमळ चं चिन्हच दिसत नाही' म्हणत संतापल्याचा व्हीडिओ वायरल होत आहे. हे पुण्यातील धायरीतील आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात महायुती कडून सुनेत्रा पवार 'घड्याळ' तर मविआ कडून सुप्रिया सुळे 'तुतारी फुंकणार्याा माणसाच्या' चिन्हावर निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. भाजपच्या पारंपरिक मतदार संघात यंदा भाजपाचा उमेदवार नसल्याने आजोबांनी राग व्यक्त केल्याचा हा एक प्रकार मतदान केंद्रातून समोर आला आहे.


पुण्यात भडकलेल्या आजोबांचा व्हिडिओ वायरल

  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies