खळबळजनक : खासदार मोहनभाई डेलकर यांचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

खळबळजनक : खासदार मोहनभाई डेलकर यांचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

 खळबळजनक  : खासदार मोहनभाई डेलकर यांचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह मुंबई : दादर हवेलीचे खासदार मोहनभाई संजीभाई डेलकर यांचा मृतदेह मारिन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ते ५९ वर्षाचे होते. याप्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मोहन डेलकर हॉटेलमधील ज्या खोलीत होते, तिथे गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट देखील पोलिसांना आढळून आली आहे.  मोहन डेलकर हे अपक्ष खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सुसाइड नोट काही बड्या लोकांची नावं असण्याची  देखील शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ही सुसाइड नोट पोलिसांच्या ताब्यात आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments