Type Here to Get Search Results !

वन परिक्षेत्र अधिकारी वर्ग-ब परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सत्कार




म्हसवड/अहमद मुल्ला : सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुजाता सुर्यकांत विरकर या शेतकरी कन्येने वन परिक्षेत्र अधिकारी वर्ग ब राजपत्रित अधिकारी या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्यामुळे म्हसवड येथील नामांकित असलेली अहिंसा  पतसंस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करणेत आला.


 आजच्या स्पर्धात्मक युगात जो लढेल तोच जिंकेल या उक्तीप्रमाणे जो संघर्ष करेल,परिश्रम करेल तोच जिंकेल असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन व म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी सत्कार मूर्ती सुजाता विरकर यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करणेत आला.


यावेळी ज्ञानवर्धिनी हायस्कुल सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.सजगाणे यांनी आपले विचार मांडताना सुजाता च्या यशमागचा खडतर प्रवास सांगितला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना कौतुकाची पहिली थाप कोण देत असेल तर अहिंसा पतसंस्था आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करणे सत्कार घेणे यासाठी सुद्धा अंगी दातृत्व असावे लागते आणि अशा दातृत्वाचे उदाहरण म्हणजे नितिन दोशी आहेत असे मत व्यक्त केले.


लुनेश विरकर म्हणाले, म्हसवड पंचक्रोशीतील विद्यार्थांना विशेषकरून मुलींना खुपप मोठी प्रेरणा मिळणार आहे. ते पुढे म्हणाले की म्हसवड पंचक्रोशीतील सर्व शाळांमधील यशस्वी विद्यार्थी असतील मार्गदर्शक शिक्षक असतील, सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्ती असतील या सर्वांना शाबासकीचा,कौतुकाचा पहिला हात अहिंसा पतसंस्थेचा असतो.


नितिन दोशी म्हणाले की, सुजाता सारख्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचे मिळवलेले यश बघूनच आम्हाला सत्कार करण्याची इच्छा निर्माण होते. सुजाता 10 वीला पहिली आली होती त्यावेळी तिचा सत्कार करताना आम्हाला मोठा सत्कार घेण्याची संधी मिळू दे अशी मागणी केली होती आणि तिने वनपरिक्षेत्र अधिकारी होऊन सत्कार घेण्याची आमची इच्छा पुर्ण करत, मुलापेक्षा मुलगी बरी सुजाता प्रकाश देईल घरोघरी असे म्हणत सुजाताचे कौतुक केले.


कार्यक्रम सुर्यकांत विरकर, माजी नगरसेवक श्री. मदने, नामदेवशेठ विरकर, मुकादम संस्थेचे संचालक महावीर व्होरा, विकास गोंजारी, अभिराज गांधी, संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच सुजाण नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले व हरिदास मासाळ यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies