Type Here to Get Search Results !

दिल्लीविरुद्ध Mumbai Indians ची Playing XI; जाणून घ्या सविस्तर माहिती.



मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. 15 व्या मोसमातील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक यावेळी मुंबई इंडियन्सचा भाग नाही. अशा स्थितीत इशान किशन कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल. यष्टीरक्षणाची जबाबदारी किशनच्याच खांद्यावर असेल. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. मात्र, तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. अशा स्थितीत युवा क्रिकेटपटू तिलक वर्मा पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. मात्र, त्यानंतर फक्त सूर्याच या जागेवर खेळताना दिसणार आहे.


हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग नसले तरी, मुंबई इंडियन्सची मधली फळी चांगलीच भक्कम दिसतेय. यावेळी मधल्या फळीत डेव्हॉल्ड ब्रेव्हिस, टीम डेव्हिड आणि कायरन पोलार्ड फलंदाजी करतील.


गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर लेगस्पिनर मुरुगन अश्विन आणि मयंक मार्कंडेय हे फिरकी विभाग सांभाळतील. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनाडकट यांच्या खांद्यावर असेल. सॅम्स व्यतिरिक्त मुंबईकडे टायमल मिल्सच्या रूपात अजून एक चांगला पर्याय आहे, पण सॅम्स बॅटिंगदेखील करतो. 


मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड, डॅनियन सॅम्स, संजय यादव, टिम डेव्हिड, फॅबियन अॅलन, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर , टायमल मिल्स, अर्शद खान, जयदेव उनाडकट, रायली मेरेडिथ, बेसिल थंपी, इशान किशन, आर्यन जुयाल, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन .



मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक


 तारीख   विरुद्ध            स्टेडियम ठिकाण

27 मार्च दिल्ली कॅपिटल्स ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई

2 एप्रिल राजस्थान रॉयल्स डीवाय पाटील स्टेडियम मुंबई

6 एप्रिल कोलकाता नाइट रायडर्स एमसीए स्टेडियम पुणे

9 एप्रिल रॉयल चँलेंजर्स बँगलोर एमसीए स्टेडियम पुणे

13 एप्रिल पंजाब किंग्स एमसीए स्टेडियम पुणे

16 एप्रिल लखनौ सुपर जायंट्स ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई

21 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स डीवाय पाटील स्टेडियम मुंबई

24 एप्रिल लखनौ सुपर जायंट्स वानखेड़े स्टेडियम मुंबई

30 एप्रिल राजस्थान रॉयल्स डीवाय पाटील स्टेडियम मुंबई

6 मे गुजराज टायटन्स ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई


9 मे कोलकाता नाइट राइडर्स डीवाय पाटील स्टेडियम मुंबई

12 मे चेन्नई सुपर किंग्स वानखेडे स्टेडियम मुंबई

17 मे सनरायझर्स हैदराबाद वानखेडे स्टेडियम मुंबई

21 मे दिल्ली कॅपिटल्स वानखेडे स्टेडियम मुंबई







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies