Type Here to Get Search Results !

उन्हाळयात केस कोरडे होऊ नयेत यासाठी ‘हे’ करा उपाय!

 



 

आटपाडी:  तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा प्रभाव फक्त  त्वचेवरच नाही तर केसांवरही दिसून येतो. सूर्यप्रकाशामुळे केसांची चमक कमी होते आणि केस खराब होऊ लागतात. उन्हाळ्यात केसांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात डोक्यात कोरडेपणा आणि खाज जास्त असते, त्यामुळे केसांचा सातत्याने त्रास होतो.



उन्हाळ्यात खूप घाम येतो, त्यामुळे केसांची काळजी घ्यावी लागते. कडक सूर्यप्रकाश केसांमधील नैसर्गिक तेल काढून घेतो आणि केस कोरडे करतो. त्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे आवश्यक आहे.



उन्हापासून बचाव करण्यासाठी केसांना स्कार्फने पुर्णपणे झाकून टाका. तसेच, केसांचा रंग सुधारण्यासाठी आठवड्यातून ३-४ दिवस केसांना नैसर्गिक तेलाने मसाज करा. दहा मिनिटे केसांना मसाज केल्याने केसांचा कोरडेपणा कमी होईल आणि केस सुंदर दिसतील.



केसांना मसाज केल्यानंतर केसांना शॅम्पू करायचा असेल तर सर्वात आधी केस ओले करा आणि नंतर केसांना शॅम्पू लावा. केसांना थेट शॅम्पू वापरू नका नाहीतर केस खराब होऊ शकतात. केसांना शॅम्पू लावल्यानंतर ते जास्त चोळू नका, उलट हलक्या हातांनी मसाज केल्याप्रमाणे केसांना शॅम्पू लावा.



उन्हाळ्यात केस अधिक कोरडे होतात, त्यामुळे केसांना कंडिशनर लावा. कंडिशनर केसांचे पोषण करेल आणि केसांमधील कोरडेपणा देखील कमी करेल. कंडिशनर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता.



उन्हाळ्यात केसांना थंड करण्यासाठी तसेच केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कोरफडीचा गर आणि केसांना तीन खास तेल वापरा. कोरफडीचा गर काढा आणि त्यात १ चमचे खोबरेल तेल, १ चमचे एरंडेल तेल, १ चमचे ऑलिव्ह ऑइल, ३ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून चांगले मिसळा आणि हा मास्क केसांना लावा. हा मास्क केसांना थंड ठेवतो तसेच केसांचा कोरडेपणा कमी करतो.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies