Type Here to Get Search Results !

अडीच वर्षाच्या चिमुकलीचा कालव्यात पडून मृत्यू; पोलिसांना मृतदेह सापडला!



पुणे: पुण्यातील हडपसर येथील हिंगणे मळ्याजवळील  कालव्यात पडून अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली  आहे. आई-वडिलांचे दुर्लक्ष झाले असता, ही चिमुकली पाण्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला  असून, पोलिसांना तिचा मृतदेह सापडला आहे.



घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी सकाळी विजय खुडे व  पत्नी शिवानी आणि दोन मुलांना रिक्षातून घेऊन जाताना  हिंगणे मळ्याजवळ असलेल्या कालव्यात कपडे धुण्यासाठी आले होते. विजय आणि शिवानी हे दोघे जण कपडे धुण्यासाठी पाण्यात उतरले. तर चार वर्षाचा रुद्र आणि अडीच वर्षाची त्रिशाका रिक्षाच्या बाजूला खेळत बसले होते. ते दोघे जण खेळत असताना त्रिशाका पाण्यात पडली. 



या सगळ्या प्रकारानंतर, रुद्रला त्रिशाका कुठे आहे, असे विचारले त्यावर त्याने मळ्याच्या दिशेने बोट दाखवले. मात्र काही केल्या ती सापडली नाही. खूप वेळ शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही चेक केल्यावर लहान मुलासोबत खेळत असताना,त्रिशाका दिसत होती.पण काही वेळाने पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर सुमारे तीस किलोमीटर अंतरावर यवत येथे  त्रिशाकाचा मृतदेह आढळून आल्याचे पोलिसानी सांगितले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies