Type Here to Get Search Results !

राज्यातील शाळांना "या" दिवशी लागणार उन्हाळी सुट्ट्या....!


पुणे : राज्यातील शाळांना २ मे ते १२ जून या कालावधी, उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर परत  २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून,  तर विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्याबाबतचा  निर्णय प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला आहे. 



करोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यानंतर उन्हाळी सुट्ट्याचे  काय असा प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला होता. यावर राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता येण्यासाठी शासन स्तरावरून निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून शासनाला  सादर करण्यात आला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies