Type Here to Get Search Results !

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील या कलाकाराने घेतला ब्रेक

 


सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील लतिका आणि अभ्याची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.  या मालिकेत  अक्षया नाईक ने लतिकाची भूमिका साकारली आहे.  या मालिकेच्या आधी अक्षयाने आजवर अनेक हिंदी मालिकामध्ये देखील काम केलेले आहे. ये रिश्ता क्या कहलाता है, या मालिकेतील तिचे पात्र खूप गाजले होते. त्यानंतर तिला अनेक मालिकांच्या ऑफर मिळाल्या. दरम्यान आता या मालिकेतून एका कलाकाराने ब्रेक घेतल्याचे समजते आहे. हा कलाकार कोण, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर ही कलाकार म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक . 


अभिनेत्री अक्षया नाईकने मालिकेतून ब्रेक घेतल्याचे समजते आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यातून समजते आहे की, ती मालिकेतून ब्रेक घेऊन हृषिकेशला गेली आहे. तिथे रिव्हर राफ्टिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच काही फोटोदेखील तिने शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.


सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका एका जाड मुलीची असली तरी ती मनामधून हळवी असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. तरी ती मॉडर्न विचार असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. नायिकाप्रधान असलेली ही मालिका सध्या चर्चे  चा विषय बनलेली आहे. अक्षया नाईककडे अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील असल्याचे सांगण्यात येते.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies