Type Here to Get Search Results !

महागाईचा आणखी एक झटका, गॅस सिलिंडरची पुन्हा दरवाढ




महागाईच्या सामोरे जात असलेल्या जनतेला इंधन कंपन्यांनी पुन्हा एकदा झटका दिला आहे. गुरुवारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ३.५० रुपये प्रति सिलिंडर आणि कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ८ रुपये प्रति सिलिंडरची वाढ करण्यात आली आहे.


एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीनंतर जवळपास सर्वच ठिकाणी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर आता १००० रुपयांच्यावर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत झालेल्या वाढीनंतर दिल्लीतर एका कमर्शिअल सिलिंडरची किंमत २३५४ रुपये झाली आहे. तर कोलकाता, मुंबई, चेन्नई या ठिकाणी ही किंमत अनुक्रमे २४५४ रुपये, २३०६ रुपये आणि २५०७ रुपये प्रति सिलिंडर इतकी झाली आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांची घट झाली होती. तर ८ मे रोजी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. १ मे रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत १०२.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. ही दरवाढ १९ किलोंच्या कमर्शिअल सिलिंडरची होती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies