Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार २३ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 

मेष:-

जुने ताण संपतील. दांपत्य जीवनातील मधुरता वाढेल. दिवस बर्यापैकी अनुकूल राहील. डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेऊ नका. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.

 

वृषभ:-

वाढीव कामातून लाभ मिळेल. आजच दिवस व्यस्त राहील. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल. कामात युक्ति वापरावी लागेल. नोकरदारांनी बदलांकडे लक्ष ठेवावे.



मिथुन:-

अडकलेली कामे मार्गी लागतील. अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. कामे जलद गतीने पार पडतील. तांत्रिक कामात यश येईल.



कर्क:-

गरज लक्षात घेऊन काम करावे. मेहनतीला मागे हटू नका. आत्ममग्न राहाल. वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या. घाईने निर्णय घेऊ नका.



सिंह:-

हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. अनावश्यक चिंतेला दूर सारावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. मोहाला बळी पडू नका.



कन्या:-

अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. एकमेकात तुलना करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे. मुलांशी हितगुज कराल. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल.



तूळ:-

साहसी कामे करतांना सावध राहावे. कामानिमित्त प्रवास घडेल. दिवस धावपळीत जाईल. समस्यांचे निराकरण झाल्याने मन खट्टू होईल. पोटाची तक्रार जाणवेल.



वृश्चिक:-

मनातील नकार काढून टाका. वडीलधार्यांचा सल्ला घ्यावा.  योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. मुलांचा विरोध जाणवू शकतो.



धनू:-

बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल.  कामाचा ताण हलका होईल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.



मकर:-

अति भावनिक होऊ नका. त्वचा विकारांकडे लक्ष ठेवा. खर्च वाढू शकतो. प्रवासात निष्काळजीपणा करू नका. योग्य संधीची वाट पहावी.



कुंभ:-

खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. प्रेमातील जवळीकीत सावध रहा. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्या. शाब्दिक चकमक टाळावी.



मीन:-

शाब्दिक चकमक टाळावी. दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. उत्तम संधीने मन प्रसन्न होईल. यशाने उत्साह वाढीस लागेल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies