![]() |
प्रा. दशरथ राजाराम सरगर |
आटपाडी : आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पुष्पाताई सरगर यांचे दीर व युवा नेते जयवंत सरगर यांचे मोठे बंधू प्रा. दशरथ राजाराम सरगर यांचे आज रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रा. दशरथ सरगर हे ठाणे येथील कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई,वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त आहे. आज त्यांच्यावर निंबवडे येथील अनुसेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.