Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार २५ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी. शांतता अधिक प्रिय असेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात.  सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. 

वृषभ:

कौटुंबिक खर्च वाढू शकतो. संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.

मिथुन:

मित्रांशी वाद घालू नयेत. मन प्रसन्न राहील. कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. 

कर्क:

अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. व्यापारातून चांगला लाभ होईल. चिडचिड न करता कामाला गती द्या. छानछोकीसाठी खर्च कराल. 

सिंह:

आत्मविश्वास कायम ठेवावा. वैवाहिक जीवन सुखकर राहील. मनाच्या चंचलतेला आवर घाला. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या.अचानक धनलाभ संभवतो.

कन्या:

नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. 

तूळ:

कामातून समाधान मिळेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. 

वृश्चिक:

परोपकाराची संधी मिळेल. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. संशयी वृत्तीला आळा घाला. पोटाचे आरोग्य सांभाळावे.

धनू:

संयमाने परिस्थिती हाताळावी. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. 

मकर:

भागीदारीत खुश असाल. स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. जवळचा प्रवास कराल.

कुंभ:

मानसिक शांतता जपावी. जुन्या विचारात गुंतून राहू नका. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल.  आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल. 

मीन:

मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.  जुने मित्र भेटतील. आपला संयम सुटू देऊ नका. घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. नवीन सुरुवात दिलासादायक असेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies