Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार २४ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

तुमच्यातील उत्साह वाढेल. गेले काही दिवस झालेली चिडचिड कमी होईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. मनोरंजनात्मक वाचन होईल. आजचा दिवस चांगला जाईल. 


वृषभ:

सरकारी नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी राखावी. मित्र व नातेवाईक कौतुक करतील. सामाजिक जाणीव जागृत ठेवाल. कामे सुरळीत पार पडतील. हस्तकलेला वाव मिळेल. 

मिथुन:

अधिकाराचा योग्य वापर करता येईल. जिव्हाळ्याची व्यक्ती भेटेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. अनावश्यक खर्च कराल. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. 

कर्क:

हौस भागवण्यावर खर्च कराल. अति घाई करू नये. जवळच्या व्यक्तींशी संपर्कातून चांगला मार्ग निघेल.  जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. स्व विचारात मग्न राहाल. 

सिंह:

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. सकारात्मकता अंगी बाणवा. कामाचा ताण जाणवेल. संपर्कातील लोकांशी चांगला संवाद साधला जाईल. योग्य गुंतवणुकीला वाव आहे. 

कन्या:

बोलण्यावर संयम ठेवा. दिवस उत्तम जाईल. दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील. घरातील अडकलेली कामे मार्गी लागतील. झोपेची किरकोळ तक्रार जाणवेल. 

तूळ:

लबाड लोकांपासून दूर राहावे. करमणूक प्रधान दिवस. कौटुंबिक गोष्टी समजूतदारपणे हाताळा. मनातील इच्छा पूर्ण होईल. अधिकाराची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. 

वृश्चिक:

मोठ्या मनाने गोष्टींकडे पहाल. घरगुती कामे करण्यात वेळ जाईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नवीन विचारांना चालना मिळेल. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल. 

धनू:

नवीन ओळखी होण्याची शक्यता. रखडलेल्या कामात मदत मिळेल. व्यावसायिक येणी मिळतील. अर्थाचा अनर्थ करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 

मकर:

आपले काम भले व आपण भले असे राहावे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. बोलण्यातून गैरसमज टाळा. घरासाठी थोडी जास्त खरेदी होईल. भावंडांशी संवाद साधावा. 

कुंभ:

मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. बोलण्यावर संयम ठेवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्याप वाढतील. दिवस इच्छेप्रमाणे घालवाल.

मीन:

प्रेमात संयम बाळगावा. एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. मन विचलीत होऊ शकते. उगाच त्रागा करू नका. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies