Type Here to Get Search Results !

माहेरातून पैसे आणणयासाठी विवाहितेला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न; सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल!



यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत खान  येथे  माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत 19 वर्षीय विवाहित तरुणीला सासरच्या लोकांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबद्दल अधिक माहिती अहि कि, महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील मुस्कान परवीन हिचा विवाह काळी दौलतच्या शेख शाहरुख शेख सलीम यांच्याशी 24 ऑक्टोबर 2019 रोजी झाला होता. त्यानंतर सासरच्या लोकांनी परवीनला माहेरुन पैसे आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरु केले. तसेच ते तिला मारहाण सुद्धा करत होते. त्यानंतर मुलीचा संसार सुखात चालवा म्हणून परवीनच्या वडिलांनी चाळीस हजार रुपये मुस्कानचे पती शाहरुखला दिले. मात्र तरीसुद्धा ते पैशांसाठी तगादा लावत होते.मुस्कानचे पती शाहरुख शेख सलीम, सुलतान शेख सलीम, शबाना बी शेख इनुस, रुबीनाबी मुनाफ या चार जणांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात 19 वर्षीय परवीनचा पाय भाजून दुखापत झाली. 



दरम्यान, या घटनेनंतर परवीनने मोबाईल फोनवरुन आपल्या वडिलांशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मुस्कानने सासरच्या लोकांविरोधात पुसद ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies