आटपाडी : वलवण येथे महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी
Team Mandesh5/06/2023 06:59:00 pm
0
वलवण येथे महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी माणदेश एक्सप्रेस न्युज आटपाडी : आटपाडी तालुक्यातील वलवण येथे विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चार आरोपी वर आटपाडी पोलिसात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी ही घराचे पाठीमागील शेतामध्ये खुरपणी करीत असताना फिर्यादीचा चुलत चुलत दीर गणेश बापुराव जाधव हा कुऱ्हाड घेवून झाडे तोडण्यासाठी आला. यावेळी फिर्यादी हिने त्यांना आमची झाडे तोडु नका असे म्हटले असता चिडुन जावून गणेश फिर्यादी हिला शिवीगाळी करीत मारहाण करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली दिली.
तर चुलत चुलत सासरे बापुराव पांडुरंग, प्रियांका बापुराव जाधव, रुक्मीणी बाबुराव गायकवाड यांनी ही फिर्यादी हिला लाथाबुक्कयांनी मारहाण करून शिवीगाळी केली आहे. सदरचा गुन्हा हा दि. 30/04/2023 रोजी सकाळी 09.30 वा चे सुमारास फिर्यादीचे शेतात वलवण येथे घडला असून सदर आरोपी गणेश बापुराव जाधव, बापुराव पांडुरंग, प्रियांका बापुराव जाधव, रुक्मीणी बाबुराव गायकवाड यांच्या विरुद्ध कलम ३५४, ५०९, ३२३, ५०४, ५०६, ३४ पप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हाच अधिक तपास पोहेकॉ पुकळे करत आहेत.