माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम बाबासाहेब देशमुख थल सैनिक कँम्प साठी निवड झाली आहे.
शुभम हा महाविद्यालयातील एन.सी.सी. तिसऱ्या वर्षा चा कॅडेट आहे. तो बी.एस्सी. च्या दुसऱ्या शाखेमध्ये शिक्षण घेत असून सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या 02 जुलै ते 13 जुलै २०२३ या कालावधीत होणाऱ्या कॅम्प साठी निवड झाली आहे.
शुभमच्या निवडी बद्दल त्याचे संस्थेचे चेअरमन, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले असून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.