Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, ०२ जुलै २०२३ : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी?मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे स्वास्थ्य बिघडेल. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात त्रास संभवतो. 


वृषभ: मित्र व स्वकीयांसह हिंडण्या - फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस काही त्रास संभवतो. 


मिथुन: शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल.  


कर्क: आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. 


सिंह: आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल.  


कन्या: आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल.  


तूळ: मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल.  


वृश्चिक: घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपार नंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील.  


धनु: कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपली वाणी व संताप ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. 

 

मकर: आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे. 


कुंभ: आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखाल.  


मीन: आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल.  

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies