Type Here to Get Search Results !

आटपाडी : आवटेवाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचांसह बिनविरोध : सरपंचपदी काँग्रेसच्या “यांची” बिनविरोध निवड



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागातील आवटेवाडी ग्रामपंचायतीसाठी लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोकनियुक्त सरपंचपदी काँगेसचे युवा नेते किरण पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


आटपाडी तालुक्यातील 17 ग्रामपंचायत साठी लोकनियुक्त सरपंच व सदस्यपदासाठी तर  व 2 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली. 


सरपंचपदी किरण पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्यपदी सुनील काकासो आवटे, राजाराम भगवान भोसले, ज्योतीराम दिगंबर आवटे, सुनंदा बाळासाहेब निकम, सुमन पांडुरंग आवटे, संगीता ज्योतीराम आवटे, संजना शंकर चव्हाण यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन सरपंच, सदस्य यांचा जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies