माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : दोन महिन्याच्या बालकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एस.टी. चालकावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना ही दिनांक 26 रोजी नेलकरंजी ता. आटपाडी येथे घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, अनिल परशु माने वय 23 रा. म्हसवड ता. माण हे काल दिनांक 26 रोजी ५.०० च्या सुमारास नेलकरंजी खरसुंडी रोडने म्हसवडकडे त्यांच्या दुचाकी वरून निघाले होते. दुचाकीवर त्यांची पत्नी लहान मुलगी व दोन महिन्याचे बाळ होते. नेलकरंजी येथील चौकात त्यांची दुचाकी आली असता त्यांच्या दुचाकीला एस.टी. बसची घासल्याने दुचाकी वरील दोन महिन्याचे बाळ हे एस.टी. च्या चाकाखाली आल्याने एस.टी. चे चाक बालकाच्या अंगावरून गेल्याने बालकाचा मृत्यू झाला.
याबाबत एस.टी. बसचा चालक पांडुरंग हातेकर वय 33 रा. आटपाडी याचे विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सदर घटनेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा