Type Here to Get Search Results !

आटपाडी : पुजारवाडी (आ) ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचांसह आठ जागा बिनविरोध : एका जागेसाठी होणार लढत



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या व माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पुजारवाडी (आ) ग्रामपंचायतीसाठी लोकनियुक्त सरपंच व सदस्यपदाच्या आठ जागा बिनविरोध निवडून आल्या असून सदस्य पदासाठी एका जागेसाठी या ठिकाणी लढत होणार आहे.


आटपाडी तालुक्यातील 17 ग्रामपंचायत साठी लोकनियुक्त सरपंच व सदस्यपदासाठी तर  व 2 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा बँकेचे संचालक असणाऱ्या तानाजी पाटील यांच्या होम ग्राउंड असणाऱ्या पुजारवाडी (आ) ग्रामपंचायत बिनविरोध होणार का? निवडणूक लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. परंतु या ठिकाणी तानाजी पाटील यांनी थेट लोकनियुक्त सरपंच व आठ सदस्य अशी ग्रामपंचायत बिनविरोध केली. परंतु या ठिकाणी एका जागेसाठी लढत होत आहे.


थेट सरपंचपदासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी धोंडीराम महादेव पुजारी यांचा एकच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सदस्यपदासाठी उज्वला विष्णू बालटे, संजय बालटे, नाना पाटील, माधुरी पुजारी, सुनिता मोटे, स्वप्नाली चव्हाण, शामराव चव्हाण, मनीषा जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर पल्लवी वाघमारे व शुभांगी मोटे यांच्यात एका जागेसाठी लढत होणार आहे. 


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies