Type Here to Get Search Results !

Samrudhhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील “त्या” 12 जणांच्या मृत्यूला RTO अधिकारी जबाबदार ; दोघांचे निलंबन ; पोलिसात गुन्हा दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज : छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातासाठी आरटीओ अधिकारी जबाबदार असल्याचे सांगत दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून त्यांच्यावर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असे लंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत. अपघात होताच आरटीओ अधिकारी त्या ठिकाणाहून पळून गेले मग नंतर परत येऊन त्यांनीच अपघात झाल्याचा फोनही केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे.



समृद्धी महामार्गावर (काल शनिवारी रात्री) झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही आहे. नाशिकहून बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांच्या ग्रुपवर काळानं घाला घातला. या अपघाताला आरटीओ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप अपघातग्रस्तांनी केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.



नाशिक जिल्ह्यातील 35 भाविक बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. ते तेथून परतत असताना वाहनाला अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक बसली. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे.


या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी फिर्यादी कमलेश मस्के याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी ड्रायव्हर ब्रिजेशकुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरटीओ अधिकारी प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचं निलंबन करण्यात आले आहे.


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies