Type Here to Get Search Results !

गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडणारे मराठा आंदोलक मंगेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.....



माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांची गाडीच्या  काचा आज सकाळच्या सुमारास मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्यासह काही तरुणांनी फोडल्या आहेत. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंगेश साबळे यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली. याप्रकरणी आता तिघांनाही जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर मंगेश साबळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचं कारण सांगितले आहे.


काय म्हणाले मंगेश साबळे 

मंगेश साबळे यावेळी म्हणाले, “मराठे माजुरडे आहेत, मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही, मराठे लाखोंच्या आणि कोट्यवधींच्या संख्येनं सभा घेतायत, ती एक जत्रा आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात. ते आमच्या भावनेला ठेच पोहोचवतात. मराठ्यांचा इतिहास तुम्ही विसरलात का? मराठ्यांचं बलिदान तुम्ही विसरलात का? मराठ्यांनी या देशाला आणि स्वराज्याला स्वातंत्र मिळावं म्हणून या मातीला रक्ताने आंघोळ घातली आहे, हे तुम्ही विसरलात का? मराठ्यांना माजुरडे म्हणणं, मराठ्यांच्या सभेला जत्रा म्हणणं आणि मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही, असं म्हणणं हे तरुणांना चेतावणी देणारं आहे. आमच्या भावना दुखावणारं आहे. त्यामुळे याला चाप बसावा म्हणून आम्ही त्यांची गाडी फोडली.” असे मंगेश साबळे म्हणाले.


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies