Type Here to Get Search Results !

आज दिनांक २३/१०/२०२३ चे राशीभविष्य : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची रास...



मेष - आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यासंबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल. 


वृषभ - नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्यान बातम्या आपणाला भाव विवश बनवतील. 


मिथुन - बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. 


कर्क - आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज-मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. भागीदारीत फायदा होईल. 


सिंह - आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. 


कन्या - पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनखर्च होईल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा ह्यापासून दूर राहणे उचित ठरेल. 


तूळ - आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. कौटुंबिक व जमीन-जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा. पाण्यापासून जपून राहा. 


वृश्चिक - आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने मनाला आनंद वाटेल. 

धनु - नाहक खर्च होईल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलग यांना तोंड द्यावे लागेल. 


मकर - एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. दांपत्य जीवनात परमानंद लाभेल. घसरणे - पडणे, जखम होणे यांपासून सावध राहा. 


कुंभ - आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे. 


मीन - आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र-स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. 


(टीप : यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, फक्त माहिती पोचविणे हा उद्देश)


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies