Type Here to Get Search Results !

एका मुलासाठी दोन मैत्रिणींची हाणामारी, महाविद्यालयाच्या दारातच भिडल्या

 


इस्लामपुरात एका मुलासाठी दोन मैत्रिणींची हाणामारी, महाविद्यालयाच्या दारातच भिडल्या

माणदेश एक्सप्रेस न्यूज 

इस्लामपूर : एका कॉफी शॉप चालविणाऱ्या मुलासाठी एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन मैत्रिणी एकमेकींशी भिडल्या आणि या प्रकरणाचा विस्फोट झाला. महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी बसस्थानकावर येईपर्यंत दोघी सोबत असायच्या. त्यातून त्या स्थानक परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये जायच्या. तेथे जाता जाता त्यातील एकीचा कॉफी शॉप चालविणाऱ्या मुलावरच जीव जडला आणि दोघातील डेटिंग सुरू झाले. ही बाब मैत्रिणीला माहीत होती. काही दिवसांनी पहिल्या मैत्रिणीचा त्या मुलाशी काडीमोड झाला आणि दुसरी मैत्रीण अलगद त्याच्या नादी लागली. दोघातील फोनाफोनीची कुणकुण पहिलीला लागली अन तिथेच तिचा जळफळाट झाला.

 

दोघींच्या मैत्रीत बिब्बा घालणारा तो मात्र नामानिराळा राहिला. बुधवारी दुपारी भर बाराच्या सुमारास शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या दारातच या दोघी एकमेकींशी अशा भिडल्या की पाहणारांचे डोळे विस्फारून गेले. झिंझ्या ओढत, गुद्दे घालत दोघींची हाणामारी झाली. त्यात एकीची बहिणसुद्धा हाणामारी करण्यासाठी सरसावली. या दारातील घटनेची माहिती प्राचार्यांपर्यंत पोहचल्यावर त्यांनी ही माहिती पोलिसांच्या निर्भया पथकाला दिली. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies