Type Here to Get Search Results !

पोलिसांच्या वाहनाची चोरी करून पळाला पण पुढे अपघात-घडला; अन एक आरोपी जाळ्यात अडकला



मुंबई : चोरट्याने वाहतूक पोलिसांचे टोइंग व्हॅन चोरी करून पळ काढला. याबाबत मुंबईसह अन्य पोलिसांना अलर्ट देण्यात आला. त्यानुसार, टोइंग व्हॅनचा शोध सुरू असतानाच या व्हॅनचा कसारा घाटात अपघात झाला आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 


वडाळा वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलिस हवालदार अनिल शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार रे रोड येथील पूर्व मुक्त मार्ग येथे हा प्रकार घडला. सायंकाळी सहा-ते साडेसहाच्या सुमारास-टोइंग व्हॅन गायब झाल्याचे समजताच खळबळ उडाली. तात्काळ सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र, घटनास्थळावरील-सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले.

 

याचदरम्यान दोन आरोपी तेथील वाहन घेऊन पसार झाले. पोलिसांनी शोध सुरू केला. दुसरीकडे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वाहनाचा कसारा घाटात अपघात झाला. यादरम्यान एका आरोपीने पळ काढला.


तर दुसरा आरोपी चालक मोनू पंडित उपाध्याय हा स्थानिक कसारा पोलिसांच्या हाती लागला. अपघातानंतर त्याचा साथीदार पळून गेला आहे. मोनू हा मूळचा मध्य प्रदेशातील देवरी येथील रहिवासी असून, शिवडी पोलिसांचे पथक त्याला मुंबईत आणण्यासाठी कसारा येथे गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies