Type Here to Get Search Results !

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू! परंतु लेकीच्या मृत्यूला आई ठरली कारणीभूत...

 


अलीकडेच उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने आठ वर्षांच्या मुलीचा दोन आठवड्यांनी मृत्यू झाला. मृत चिमुकलीच्या आईने उपचारासाठी रेबीज प्रतिबंधक लसीऐवजी घरगुती उपचार वापरले असल्याने हा मृत्यू ओढवला आहे. 


सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC), ब्लॉकचे प्रमुख डॉ जितेंद्र वर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, की कुटुंब उपचारासाठी केंद्रात आले होते आणि त्यांना एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. मात्र, त्यांनी त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. 


मुलीला १०-१५ दिवसांपूर्वी एका भटक्या चावला होता. तिने या घटनेची माहिती तिच्या आईला दिली होती, तिने तिच्यावर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय केले. मृत चिमुकली व कुटुंब हे बह ब्लॉकच्या चौसांगी गावातील रहिवासी असून तिचे वडील मजूर आहेत आई गृहिणी आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies