Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८२.११ टक्के मतदान ; सर्वात जास्त मतदान मासाळवाडी ग्रामपंचायतसाठी तर सर्वात कमी.....



माणदेश एक्सप्रेस न्युज  : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायत व एका ग्रामपंचायतमध्ये एका जागेसाठी आज मतदान संपन्न झाले. तालुक्यामध्ये सर्वात जास्त मतदान हे मासाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये झाले असून सर्वात कमी मतदान हे चिंचाळे ग्रामपंचायतीमध्ये झाले आहे.


आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये मासाळवाडी या ठिकाणी किरकोळ वादावादी तर निबंवडे येथे एकमेकांना मारहाण करण्यात झाली असून मध्ये तीन जण जखमी झाले आहेत. हा प्रकार वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान संपन्न झाले. सकाळ पासूनच मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. करगणी येथे मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती. मतदार मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत होते.


सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी चांगली होती. तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतसाठी ९१.२८ टक्के मतदान झाले. पिंपरी खुर्द ग्रामपंचायतसाठी ८४.९२ टक्के मतदान झाले. मासाळवाडी ग्रामपंचायतसाठी ९६.३७ टक्के मतदान झाले. निंबवडे ग्रामपंचायत साठी ८३.८४ टक्के मतदान झाले. वाक्षेवाडी ग्रामपंचायतसाठी ८८.87 टक्के मतदान झाले. विभूतवाडी ग्रामपंचायतसाठी ८२.३७ टक्के मतदान झाले. नेलकरंजी ग्रामपंचायतसाठी ७८.७७ टक्के मतदान झाले.  


कानकात्रेवाडी ग्रामपंचायतसाठी ८५.१९ टक्के मतदान झाले.  करगणी ग्रामपंचायतसाठी ८१.८१ टक्के मतदान झाले.  काळेवाडी ग्रामपंचायतसाठी ८७.१० टक्के मतदान झाले. मानेवाडी ग्रामपंचायतसाठी ८५.१७ टक्के मतदान झाले. बनपुरी ग्रामपंचायतसाठी ८२.८१ टक्के मतदान झाले. मिटकी ग्रामपंचायतसाठी ८६.०२ टक्के मतदान झाले. 


चिंचाळे ग्रामपंचायतसाठी ७१.४३ टक्के मतदान झाले. पूजारवाडी ग्रामपंचायतीसाठी फक्त एका जागेसाठी मतदान झाले असून या ठिकाणी २७.४७ टक्के मतदान झाले.        




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies