Type Here to Get Search Results !

आटपाडी येथील एका निवासी विद्यालयातील विद्यार्थ्याला बेदम मारहाण ; शिक्षकाकडून प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील निवासी विद्यालयातील इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्याला इतर तीन विद्यार्थ्यांनी रात्रभर बेदम मारहाण केल्याचा प्रकार आज उजेडात आल्याने या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून सदरचे प्रकरण मात्र या निवासी विद्यालयाकडे मिटविण्याचा प्रकार झाला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी, आटपाडी येथे इयत्ता पहिली पासून १२ वी पर्यत निवासी विद्यालय आहे. सदरचे निवासी विद्यालय हे शिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याने व विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकत असल्याने या ठिकाणी आपल्या मुलास निवासी ठेवल्यास त्याची शिक्षणात प्रगती होईल या आशेने या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी निवासी असून शिक्षण घेत आहेत.


या निवासी विद्यालयात चोपडी ता. सांगोला येथील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत होता. काल दिनांक 04 रोजी रात्री त्याला त्याच्याच वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर तीन सहकारी विद्यार्थ्यांनी त्याला ‘आमच्या नावे शिक्षकांना सांगतो’ या कारणावरून पाईप, कंबरेचा बेल्ट यांनी बेदम मारहाण केली. 


या झालेल्या मारहाणीमध्ये सदर विद्याथी गंभीर जखमी झाला. सदरची बाब विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितली. यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या वडीलांना सांगितली. 


परंतु सदरची घटना गंभीर असल्याने या निवासी विद्यालयातील शिक्षकांनी  हे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले. परंतु मारहाण झालेल्या विद्यार्थ्याला दवाखान्यात दाखल केले नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यानी मारहाण केली आहे त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना तेथून जाण्यास एकप्रकारे मदत देखील केली आहे.


वास्तविक सदरचे प्रकरण हे गंभीर असल्याने मुख्याध्यापक यांनी याबाबत त्या तीन विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई करायली पाहिजे होती. परंतु केवळ पैसा घेवून शिक्षण द्यायचे व आपण मात्र नामनिराळे राहायचे हे काम हे निवासी विद्यालय करत आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies