Type Here to Get Search Results !

आम. गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र म्हणाले, सरकारच्या ‘त्या’ समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करावा



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच एक पत्र लिहिले असून या पत्राद्वारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्तीप्रदत्त समिती मध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे.


धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असावा अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.


गोपीचंद पडळकर यांनी पत्रात म्हटलंय की, राज्यभरात झालेल्या उपोषणांनंतर आपल्या महायुती सरकारने आरक्षण अंमलबाजवणीसाठी पुढाकार घेतला. आपल्या अध्यक्षतेखाली ‘धनगर शक्तिप्रदत्त समिती’ बनते आहे. ती प्रभावीपणे काम करेल याची आशा आहे. मात्र, ज्यांनी धनगर आरक्षणासाठी प्रामाणिक काम केले अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच या समितीत स्थान नाही. समितीत देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात यावे ही भावना समस्त समाजाची आहे असं त्यांनी म्हटलं.


त्याचसोबत जे आदिवासांना ते धनगरांना ही मुळात संकल्पनाच देवेंद्र फडणवीसांची आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात धनगरच ‘धनगड’ असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. योजनां पासून ते आरक्षण अंमलबजावणी पर्यंत सर्व प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या समितीत समावेश करावा अशी मागणी आमदार पडळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies