Type Here to Get Search Results !

देशमुख महाविद्यालयाच्या “या” विद्यार्थ्यांने ऑल इंडिया तायक्वांदो स्पर्धेत कास्यपदकावर नाव कोरले



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या हर्षवर्धन अनिल सागर या खेळाडूने जयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेमध्ये कास्यपदक प्राप्त करून आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. 


आटपाडी तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावरती कोरण्याचे काम हर्षवर्धन अनिल सागर या खेळाडूने केले आहे. सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा कष्ट, जिद्द, मेहनतीच्या बळावरती एवढे मोठे यश प्राप्त केल्यामुळे आटपाडी तालुक्यांमध्ये खूप मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आणि अमरसिंह देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले केले असून त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.भोसले, डॉ.अंकुश कोळेकर, ऑफिस अधीक्षक पांडुरंग माळी, क्रीडाशिक्षक प्रा.गौरव चव्हाण उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies