Type Here to Get Search Results !

हटके : भर साखरपुडा सोहळ्यात रंगला क्रिकेटचा फिव्हर ; स्क्रीनवर लावली लाईव्ह क्रिकेट मॅच; व्हिडीओ एकदा पहाच...

  


साखरपुड्याच्या कार्यक्रमात लावल्या जाणाऱ्या मोठ-मोठ्या स्क्रीन्सवर आजवर आपण जोडप्यांचे सुंदर फोटो, व्हिडीओ किंवा काही वेळा चित्रपटातील गाणी, डान्स पाहिले असतील. 


पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात लावलेल्या स्क्रीनवर चक्क भारतीय संघाची लाईव्ह क्रिकेट मॅच सुरू असल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाही तर साखरपुड्याचे सूचसंचालन करणारी व्यक्तीही क्रिकेट कॉमेंट्री करत आलेल्या पाहुण्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. 


यामुळे साखरपुड्यात आलेल्या पाहुण्यांमध्येही क्रिकेटचा वेगळाच फिव्हर पाहायला मिळाला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका स्टेजवर साखरपुड्याचे विधी सुरू आहेत. नवरा-नवरीच्या घरातील पाहुणे मंडळी स्टेजवर विधीत मग्न आहेत. पण, समोर बसलेली पाहुणे मंडळी चक्क मॅच बघण्यात व्यस्त झाली आहेत.


 साखरपुड्याच्या स्टेजच्या बाजूच्याच स्टेजवर एका भल्यामोठ्या स्क्रीनवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा लाईव्ह सामना सुरू होता. इतकंच नाही, तर साखरपुडा सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारी महिला चक्क क्रिकेट कॉमेंट्रीही करताना दिसली. त्यामुळे या हटके साखरपुडा सोहळ्याची आता खूप चर्चा होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies