Type Here to Get Search Results !

Video : आम.गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा ; म्हणाले, अन्यथा तुम्हांला रोषाला सामोरे जावे लागेल...!



माणदेश एक्सप्रेस न्युज: आटपाडी : धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवसे दिलेली मुदत संपली असून समाजाची एक ही मागणी मान्य झाली नसल्याने (Gopichad Padalkr) आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इशारा देत धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले असे म्हंटले आहे.


याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे.आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे.


तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे. आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारचा नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होइल , ही आशा सामान्य धनगरांना आहे. मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत.त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे. 


समित्या गठित करूण धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना समान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे.आपण वेळीत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा.अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रीयेला व आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम ५ कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे.


आमदार गोपीचंद पडळकर यांचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies