Type Here to Get Search Results !

आटपाडीत आज सहकार भारतीची बैठक : बैठकीस सहकार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील नागरी तसेच ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, सचिव यांची सहकार सप्ताह समारोप व सहकार भारती तर्फे दिल्ली येथे आयोजित केलेल्या दि २ व ३ डिसेंबर २०२३ रोजी पतसंस्थाचे राष्ट्रीय अधिवेशन संदर्भात माहिती देण्यासाठी आटपाडी येथे बैठक आयोजित करण्यात आली असून सदर बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या बैठकीस सहकार भारतीचे कोल्हापूर विभाग प्रमुख चंद्रकांत धुलप, महाराष्ट्र प्रदेश महिला सहप्रमुख सहकार भारती व सांगली अर्बन बँकेच्या संचालिका अश्विनी आठवले, सहकार भारतीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष शिवप्रसाद शेंडे, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रकांत खंकाळे ( प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था) या मान्यवरांच्या उपस्थितीत आज दिनांक २१/११/२०२३ रोजी दुपारी ठीक २:३० वाजता श्री संत सावता माळी पतसंस्था मर्यादित आटपाडी या संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


तरी सदर बैठकीस सहकार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाबासाहेब माळी अध्यक्ष, सहकार भारती आटपाडी तालुका,  चंद्रकांत दौंडे, उपाध्यक्ष सहकार भारती आटपाडी तालुका, सतीश भिंगे जिल्हा महामंत्री सहकार भारती, दत्तात्रय स्वामी पतसंस्था प्रकोष्टप्रमुख सहकार भारती सांगली जिल्हा यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies