Type Here to Get Search Results !

धक्कादायक: बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना! 22 वर्षीय तरुणीवर बापानेच केला अत्याचार



नालासोपारा : पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी असतानाही मुलीला घरात डांबून तिला मारहाण करत अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे.


उपचार सुरू असलेल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी नालासोपारा येथे राहत होती. संबंधित प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी तो देत होता. 


मुलीला तो बळजबरीने घरात डांबून ठेवत होता. त्यामुळे पीडित आणि तिची आई भीतीपोटी गप्प राहत होते. हे प्रकार सातत्याने वाढत होते. या काळात मुलगी गर्भवती झाली होती. त्यावेळी तिचा आरोपी पित्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला होता. 


मागील ३ महिन्यांपासून ती क्षयरोगाने आजारी होती. तिला ११ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies