Type Here to Get Search Results !

आटपाडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा यांनी केली पोलखोल



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी :  आटपाडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी यांनी केली पोलखोल केली आहे. आटपाडी शहराच्या साई मंदिर चौक ते बस स्थानक मार्गे आटपाडी पोलीस ठाणे या मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे मुजविण्याचे काम गेल्या एक महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र पंधरा दिवसातच मुजविलेले खड्डे पुन्हा आहे त्या स्थितीत झाल्याने यामागील बांधकाम विभागाचे भिंग फुटले आहे. राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी या कामाबाबत आटपाडी येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 


आटपाडी शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी बांधकाम विभागाने तब्बल 11 लाख 85 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. याचे काम कराड येथील मेगा ऑटोबन यांना मिळाले होते. सदर कंपनीने रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे काम केले. परंतु १५ दिवसातच पुन्हा खड्डे जैसे थे परिस्थितीत झाले. याबाबत अनिता पाटील यांनी बांधकाम विभागाकडे आटपाडी शहरातील खड्डे मुजविलेलेचे अंदाजपत्रक बाबत चौकशी केली होती. मात्र अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी माहिती अधिकाराचा कायद्याचा अधिकारी वापरून माहिती मागविली.


या माहितीमध्ये खड्डे मोजण्याचे काम 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत केले असल्याचे नमूद करण्यात आले. या रस्त्याच्या खड्डे मोजण्याचे अंदाजपत्रक तब्बल 11 लाख 85000 इतके दाखवण्यात आले आहे. मात्र खर्च नेमका किती झाला याबाबत कोणताही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. खड्डे १५ दिवसात उघडे पडले असल्याने खड्डे भरत असताना शाखा अभियंता उपस्थित होते का? त्यांच्या देखरेखीखाली काम झाले का?  त्याची क्वालिटी तपासणी करण्यात आली का? असे अनेक प्रश्न अनिता पाटील यांनी उपस्थित केले असून आटपाडी शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies