Type Here to Get Search Results !

जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे बाप-लेकीचं; असाच बाप लेकीच्या डान्सचा व्हिडीओ होतोय चांगलाच व्हायरल...

 


सोशल मीडियावर आईवडील आपल्या लहान मुलांचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. काही व्हिडीओ खूप सुंदर असतात. लहान मुलांना डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले. 


 पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये चिमुकली तिच्या वडिलाबरोबर डान्स करताना दिसत आहे. बापलेकीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.


बाप लेकीच्या नात्यात खूप जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी असते. वडील जीव ओतून मुलीवर प्रेम करतो. या व्हिडीओमध्ये सुद्धा वडील मुलीच्या नात्यातील अनोखे प्रेम दाखवले आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोक भावूक सुद्धा होतील.


हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. स्टेजवर वडील आणि चिमुकली डान्स करताना दिसत आहे. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील गाण्यावर ते डान्स करताना दिसत आहे.


चिमुकली आणि वडील एकमेकांना उद्देशून म्हणतात, ” ये लडता है, आ हा..अकडती है, हे हे… झगडता है, बिघडती है.. दिवाना है, दिवानी है… बट शी इज युअर बेस्ट फ्रेंड यार” त्यानंतर ते ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाची सिग्नेचर स्टेप करतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. बापलेकीच्या नात्यातील गोडवा पाहून तुम्हालाही तुमच्या मुलीची किंवा वडिलांची आठवण येऊ शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies