Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२३: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...



मेष: रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल. 


वृषभ: शारीरिकदृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल. शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्याची शक्यता आहे. 


मिथुन: आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. आपल्या मान - सन्मानात व लोकप्रियतेत वाढ होईल. 


कर्क: आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आपल्या सहवासात कुटुंबियांचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. 


सिंह: आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल. स्नेही व मित्र यांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकेल. 


कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नीबरोबर वाद किंवा मतभेद होतील. तब्येतीची काळजी वाटेल. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहावे. 


तूळ: आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपसातील संबंध सुधारतील. 


वृश्चिक: आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावले जाईल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन संयमित ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येईल. 


धनु: आर्थिक लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. एखादा प्रवास संभवतो. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. स्नेहीजनां कडील मांगलिक प्रसंगात सहभागी व्हाल. यश - कीर्ती वाढीस लागेल. 


मकर: एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील. धनहानी व मानहानीची शक्यता आहे. आज एखाद्या गूढ विद्येकडे आपला कल होईल. वाणीवर ताबा ठेवावा लागेल. 


कुंभ: आज आपणांस मिळणार्याए फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. संततीबरोबर चांगले संबंध राहतील. प्राप्तीत वाढ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल. 


मीन: नोकरी - व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. वयस्कर व वडील यांचेकडून लाभ होईल. कौटुंबिक आनंदामुळे आपण आनंदी राहाल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies