Type Here to Get Search Results !

लेंगरेवाडीच्या सरपंचपदी “यांची” निवड : निवडीनंतर ब्रह्मदेव पडळकरांच्या हस्ते सत्कार



माणदेश एक्सप्रेस न्युज :आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी गावाच्या सरपंचपदी मालन बापू लेंगरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. निवडीनंतर नूतन सरपंच मालन बापू लेंगरे यांचा सत्कार सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला.


लेंगरेवाडीच्या पंचवार्षिक निवडीमध्ये या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या गटाची सत्ता आली होती. यावेळी सरपंच पदी वंदना बजरंग लेंगरे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. परंतु सरपंच वंदना लेंगरे यांच्या मनमानी क्रभाराला कंटाळून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी आटपाडी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास दाखल केला होता.


सरपंच वंदना लेंगरे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यामुळे नूतन सरपंचपदा साठी मालन बापू लेंगरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 


निवडी नंतर नूतन सरपंच मालन लेंगरे यांचा सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आटपाडी बाजार समितीचे माजी संचालक विष्णू अर्जुन यांच्या सह लेंगरेवाडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies