Type Here to Get Search Results !

Video : मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो; मी सांगेल ते करायचे : शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांनाच भरला दम



माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांनाच दम भरला असून याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून खरच तानाजी सावंत मुख्यमंत्री यांची ऐकत नाही का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. एका कार्यक्रमावेळी ते धाराशीवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या व्हिडिओतील संवादानुसार तानाजी सावंत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना एक काम सांगत आहेत. त्यावर कुलकर्णी डिस्कस करु, असे म्हणतात. त्यावर नो डिस्कस, मी सांगितले तर करायचे म्हणजे करायचे, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही तर बाकी काय, असे ते म्हणतात. पुन्हा उचलून फेकू, नंतरचे नंतर बघू असेही तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. 


यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमधून सुषमा अंधारे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली आहे. कोणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी गृहखात्याची अवस्था झाल्याची टीका अंधारे यांनी केली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies