Type Here to Get Search Results !

दुष्काळी तालुक्यात समावेश नसल्याने जत तहसिलदारांची मोटार फोडली

 




माणदेश एक्सप्रेस न्यूज 

जत : जतचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला नसल्याने जतमध्ये प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांने तहसिलदारांची मोटार बुधवारी सकाळी फोडली. मोटारीच्या काचावर काठीने मारुन शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. जत तालुक्यावर पुन्हा शासनाकडून अन्याय दुष्काळ च्या यादीतुन जत तालुक्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे तहसीलदार यांची गाडी आज सकाळी फोडली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.

 राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत जिल्ह्यातील खानापूर, मिरज, शिराळा, कडेगाव या तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. जतसह आटपाडी, तासगाव व कवठेमहांकाळ या चार तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies