Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील "या" तलावाच्या शुशोभिकरणासाठी २ कोटी ८५ लाख रुपये निधी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी :  राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत आटपाडी तालुक्यातील आटपाडी तलावांची निवड झाली आहे. यासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.


या तलावाचा किनारा सौंदर्यीकरण, हरित पट्टा, संरक्षक भिंत, हायमास्ट पोल, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे इ. अशा पद्धतीने कामे करण्यात येणार आहेत. राज्यातील तलाव-सरोवरे आणि मोठे जलाशय पर्यावरणदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने सन २००६ – ०७ या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू केली आहे.


यामध्ये तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्त्रोत निश्चित करून प्रदूषण रोखणे, तलावात साचलेला आवश्यक घातक गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, तलावातील अनावश्यक आणि उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे, तलावातील जैविक प्रक्रियेद्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारणे, यासह किनारा सौंदर्य सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे, तलावाला कुंपण तयार करणे, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे यामध्ये उभारण्यात येणार आहे.


आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) हे आटपाडी तलाव सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्नशील होते. आमदार बाबर यांनी राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निधी मिळावा म्हणून याबाबत प्रयत्न केले होते. त्यानुसार आटपाडी तलावासाठी सुमारे २ कोटी ८५ लाख रुपये निधी मिळणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies