Type Here to Get Search Results !

अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते आटपाडीतील जग्वार सिटीत वृश्चलागवड मोहिमेचा शुभारंभ



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील जग्वार सिटी येथे वृश्चलागवड मोहिमेचा शुभारंभ सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते हस्ते संपन्न होत आहे. उद्या दिनांक १७ रोजी सकाळी १०.०० वाजता सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.


५ लाख घरे, १ कोटी वृक्षलागवड आणि १ हजार उद्योजक घडविणे  हे ध्येय उराशी बाळगून शिवजल व्हीएनएस ग्रुप च्या वतीने 1 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत आटपाडी येथील जग्वार सिटी येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्याहस्ते १५०० वृक्ष लागवडीचा शुभारंभ उद्या दिनांक  १७ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे.


ग्रामीण लोकांना शहरी सुविधा देण्यासाठी जग्वार सिटीचा प्रकल्प राबविला जात आहे. आधुनिकतेची जोड देणारा गृहप्रकल्प उलपव्ध करून देण्यासाठी अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वखाली व्हीएनएस ग्रुप, शिवजल ग्रुपने कष्ट घेतले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजल व्हीएनएस ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies