Type Here to Get Search Results !

सांगलीचे माजी महापौर अजित पवारांच्या गटात दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर व जयंत पाटील गटाचे प्रमुख नेते राहिलेले दिग्विजय सुर्यवंशी आज अखेर अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. यावेळी यावेळी त्यांच्यासमवेत शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, अॅहड. अमित शिंदे हे उपस्थित होते. सूर्यवंशी यांच्या प्रवेशाने सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला हळूहळू धक्के बसू लागले आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुर्यवंशी यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. ही भेट वैयक्तिक पातळीवरील असून आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता. मात्र, आज त्यांनी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असल्याचे जाहीर केले. यामुळे सांगलीतील आमदार पाटील यांच्या गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies