कोणतीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर.बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो.
कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही.
याचाच प्रत्यय देणाऱ्या एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.सोशल मीडियावर बाप-लेकीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. वडिलांच्या राज्यात मुलगी राज्य करते.
मुलगी ही खूप नशिबान लोकांच्या घरात जन्माला येते. लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या वडिलांच्या गाडीवर बिनधास्तपणे बसली आहे. एरवी गाडीवर एकटी बसायला घाबरणारी ती वडिलांच्या मागे बिनधास्त बसून प्रवासाचा आनंद घेत आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा