Type Here to Get Search Results !

हटके: ‘या’ लग्नपत्रिकेची होतेय सगळीकडे चर्चा; ही लग्नपत्रिका आहे की! व्हायरल लग्नपत्रिका पाहून तुम्हीही व्हाल चकित



हटके लग्नसोहळ्याची सुरुवात लग्नपत्रिका निवडण्यापासूनच होते, असे म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नपत्रिकेचा फोटो खूप व्हायरल होत आहे. ही लग्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल! पण, त्या लग्नपत्रिकेत काय हटके आहे ते जाणून घेऊ.


या कार्डाच्या एक साइडवर ‘वेडिंग इन्व्हिटेशन’सोबत वधू-वरांची नावे आणि लग्नाची तारीख लिहिलेली आहे; तर दुसऱ्या साइडला लग्नस्थळाच्या पत्त्यासह उर्वरित महत्त्वाची माहिती छापण्यात आली आहे. 


एटीएमवर ज्याप्रमाणे ठरावीक जागेत ठरावीक गोष्टी लिहिलेल्या असतात, अगदी त्याचप्रमाणे एटीएम कार्डप्रमाणे दिसणाऱ्या या लग्नपत्रिकेवर सर्व गोष्टी लिहिल्या आहेत.


पण, आता सोशल मीडियावर या एटीएम कार्ड थीम असलेल्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा आहे. अनेक युजर्सना ही हटके लग्नपत्रिका फार आवडली आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies